छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक मतदान शनिवारी (दि.७) पार पडले. ग्रामीण भागात मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला.
सिल्लोड तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. केरळा जिल्हा परिषद गट व निल्लोड पंचायत समिती गणसाठी कायगाव येथील मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी गावातील ९६ वर्षीय शकुंतलाबाई देविदासराव भालेराव यांनी कुटूंबासह मतदानाचा हक्क बजावला.
त्यांची मुले सेवानिवृत्त शिक्षक रत्नाकर भालेराव, व सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी दिवाकर भालेराव यांच्यासह सुना नातवंडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. ९६ वर्षीय शकुंतलाबाई भालेराव यांना ग्रामस्थ तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले.











